Wed, Feb 19, 2020 08:39होमपेज › Nashik › दोघांच्या झुंजीत एका बिबट्याने गमावला प्राण

दोघांच्या झुंजीत एका बिबट्याने गमावला प्राण

Published On: Jan 03 2018 1:15AM | Last Updated: Jan 02 2018 11:47PM

बुकमार्क करा
सिन्नर : प्रतिनिधी

दोन बिबट्यांच्या झुंजीत एकवर्षीय बिबट्या ठार झाल्याची घटना सोमवारी (दि.1) सायंकाळी तालुक्यातील पांढुर्ली शिवारात उघडकीस आली.पांढुर्ली येथील शेतकरी योगेश वाजे यांच्या शेतात ऊसतोडणीचे काम सुरू होते. सायंकाळी ऊसतोड कामगारांना शेतात बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. त्यांनी तत्काळ ही माहिती वाजे यांना दिली. वाजे यांनी घटनेची माहिती वनपरिक्षेत्रपाल मनोहर बोडके यांना दिली. 

माहिती मिळताच बोडके यांच्यासह नाशिकचे सहायक वनसंरक्षक मकदुम, सिन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर बोडके, वनपाल ए. के. लोंढे, वनरक्षक बाबूराव सदगीर, सिन्नर पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एम. बी. भणगे आदींसह वनकर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. डॉ. भणगे यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केले.

दोन बिबट्यांच्या झुंजीत मयत बिबट्याच्या उजव्या पुढच्या व मागच्या पायाचे अन्य दुसर्‍या बिबट्याने लचके तोडल्याचे दिसून आले. बिबट्याच्या छातीचेही लचके तोडण्यात आले होते. दोन बिबट्यांच्या झुंजीत त्याचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज पशुवैद्यकीय व वनविभागाने व्यक्त केला आहे. शवविच्छेदनानंतर बिबट्यावर अंत्यसंस्कार केले.