Sat, Jul 20, 2019 08:35होमपेज › Nashik › नाशिक : मंडप गोडाऊनला भीषण आग

नाशिक : मंडप गोडाऊनला भीषण आग

Published On: Mar 15 2018 7:13PM | Last Updated: Mar 15 2018 7:13PMनाशिक : प्रतिनिधी

भारत नगर येथे मंडपच्या गोडाऊनला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.  मात्र, १५ ते २० लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आज (गुरुवार) दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, भारत नगर येथे लग्न कार्यासाठी लागणाऱ्या मंडप डेकोरेशनचे गोडाऊन आहे. या गोडाऊनला आज दुपारच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यावेळी परिसरातील नागरिकांनी प्रसंगावधान राखत आग लागलेल्या परिसरातील  झोपड्डीमधील नागरिकांना सुरक्षितस्‍थळी हलवले आणि याबाबत तातडीने अग्निशमन दलास कळवले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत ही आग आटोक्यात आणली.