Sat, Feb 23, 2019 10:27होमपेज › Nashik › शिवडे येथे ‘समृद्धी’च्या नावाने शिमगा

शिवडे येथे ‘समृद्धी’च्या नावाने शिमगा

Published On: Mar 03 2018 2:06AM | Last Updated: Mar 03 2018 2:04AMसिन्नर : प्रतिनिधी

प्रस्तावित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनास सुरुवात केली आहे. मात्र, तालुक्यातील शिवडे परिसरात समृद्धी महामार्गाला विरोध कायम असल्याचे चित्र शुक्रवारी (दि.2) धुळवडीला बघावयास मिळाले. धुळवड मिरवणुकीनिमित्त डसन डुकरी आणि राक्षसाचे रूप धारण करत समृद्धिबाधितांनी समृद्धीविरोधाचे फलक झळकाविले.

मुंबई-नागपूर महामार्ग रद्द झालाच पाहिजे, जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, शेती वाचवा, शेतकरी वाचवा आदी फलक हातात शेतकरी धुळवडच्या मिरवणुकीत सहभागी झाले होते. 
गावातील लहान मुलांनी डसन डुकरीचे, राक्षसाचे रूप धारण करत समृद्धीच्या राक्षसाने शिवडेकर त्रस्त असून, आगामी काळात संघर्षासाठी तयार असल्याचा संदेश दिला. त्यामुळे समृद्धीच्या भूसंपादनाचा वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

या मिरवणुकीत सोमनाथ वाघ, उत्तम  हारक, विष्णू हारक, भास्कर वाघ, सतीश खेलुकर,
शिवाजी वाघ, कैलास हारक आदींसह परिसरातील शेतकरी सहभागी झाले होते.