होमपेज › Nashik › आव्हाड यांच्या निधनामुळे जिल्ह्यातील अभ्यासू व्यक्तिमत्व हरपले : भुजबळ

आव्हाड यांच्या निधनामुळे जिल्ह्यातील अभ्यासू व्यक्तिमत्व हरपले : भुजबळ

Published On: Jul 10 2018 7:51PM | Last Updated: Jul 10 2018 8:23PMनागपूर : प्रतिनिधी 

क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे माजी अध्यक्ष तसेच, नाशिक जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती एन.एम.आव्हाड यांच्या निधनामुळे जिल्ह्यातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व कायमचे हरपले असल्याच्या शोक भावना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. 

छगन भुजबळ यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे की, ज्येष्ठ नेते एन. एम. आव्हाड यांनी क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेत अध्यक्षपद आणि नाशिक जिल्हा परिषदेचे बांधकाम समिती सभापतीपद भूषविले होते. एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचे आणि आमचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. शैक्षणिक संस्थेत तसेच जिल्हा परिषदेत त्यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले होते. ओबीसी समाजाचे संघटन करण्यात. तसेच सामाजिक कार्यातही त्यांचे मोलाचे योगदान होते.

आपल्या प्रेमळ आणि उमद्या स्वभावाने सर्वांची मने जिंकून घेणारे ते एक व्यक्तिमत्व होते. त्यांच्या निधनाने जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक तसेच राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. मी आणि माझे कुटुंबीय आव्हाड कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो असे भुजबळांनी शोक संदेशात शेवटी म्हटले आहे.