Mon, Apr 22, 2019 23:41होमपेज › Nashik › छगन भुजबळांच्या समर्थनार्थ येवल्यात सत्याग्रह आंदोलन

छगन भुजबळांच्या समर्थनार्थ येवल्यात सत्याग्रह आंदोलन

Published On: Jan 03 2018 1:15AM | Last Updated: Jan 02 2018 11:25PM

बुकमार्क करा
येवला : प्रतिनिधी

आमदार छगन भुजबळ यांच्यावर सूडबुद्धीने सुरू असलेल्या कारवाईबाबत येवला तहसील कार्यालयासमोर मोठ्या संख्येने जमलेल्या भुजबळ समर्थकांकडून मंगळवारी (दि.2) सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. यावेळी भुजबळ समर्थक समन्वय समितीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदारांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले.

यावेळी  अ‍ॅड. माणिकराव शिंदे, अंबादास बनकर, साहेबराव मढवई, गुणवंत होळकर, जयदत्त होळकर, अकबर शहा, पुंडलिक वरे, प्रकाश वाघ, वसंत पवार, डॉ. भारती पवार, डॉ. स्वाती सोनवणे, मायावती पगारे, भागवत सोनवणे, गोरख नेवासकर, हरिभाऊ जगताप, धनंजय जोशी यांनी मनोगत व्यक्त केले.  या आंदोलनामध्ये येवला-लासलगाव मतदारसंघातील सर्वपक्षीय भुजबळ समर्थकांनी ‘मी भुजबळ’ असे लिहिलेल्या टोप्या परिधान केलेल्या होत्या. भुजबळांना नाहक विविध कारणे दाखवून जेलमध्ये ठेवण्यात येत असल्याचा आरोप समर्थकांनी केला. यावेळी राधाकिसन सोनवणे, अरुण थोरात, भाऊसाहेब बोचरे, सुनील पैठणकर, ज्ञानेश्‍वर शेवाळे, साहेबराव आहेर, अण्णासाहेब दौंडे, पोपट धनवटे, संजय बनकर, महेंद्र काले, किसन धनगे, शिवाजी वडाळकर, पांडुरंग राऊत, विलास गोरे, प्रदीप सोनवणे, निसार निंबुवाले, तात्या लहरे, एकनाथ गायकवाड, समीर देशमुख, मोहन शेलार, सचिन कळमकर, मुशरीफ शाह, दीपक लोणारी, अशोक नागरे, दत्ता रायते, संतु पा. झांबरे, नगरसेवक डॉ. संकेत शिंदे, प्रवीण बनकर, मलिक शेख, सचिन शिंदे,  शेख तहसीन, मोमीन साबीया, शेख रईसाबानो, निता परदेशी, प्रा. शीतल प्रशांत शिंदे आदी उपस्थित होते.