Mon, Jul 13, 2020 21:58होमपेज › Nashik › कुत्र्याने तोडले दहा जणांचे लचके

कुत्र्याने तोडले दहा जणांचे लचके

Published On: Dec 15 2017 2:45AM | Last Updated: Dec 14 2017 11:10PM

बुकमार्क करा

सातपूर : वार्ताहर

पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल 10 जणांचे लचके तोडल्याची घटना बुधवारी (दि.13) रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली. अशोकनगरमधील स्वामी विवेकानंदनगर, वास्तुनगर येथे ही घडली. जखमी नागरिकांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेमुळे सातपूर परिसरातील मोकट कुत्र्यांचा प्रश्‍न पुन्हा समोर आला असून, परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. 

राम बागले, निर्मला राऊत, अंबाजी गांगुर्डे, मोहन पंडित, किकरा गोंड, अमोल पांचाळ, विजय निगळे, साधना जावलेकर, अमित यादव या जखमींना उपचारासाठी खासगी व जिल्हा रुग्णालयात करण्यात आले. जखमी 10 जणांमध्ये एका अडीच वर्षाच्या बालकाचा समावेश आहे.  आठ दिवसापूर्वीच सातपूर गावात एका लहान मुलीला कुत्र्याने चावा घेतल्याची घटना घडली होती.