Mon, May 20, 2019 18:52होमपेज › Nashik › नाशिक : सटाणाजवळ शिवशाही बसचा अपघात, २० जण जखमी

नाशिक : सटाणाजवळ शिवशाही बसचा अपघात, २० जण जखमी

Published On: Jul 15 2018 11:49AM | Last Updated: Jul 15 2018 11:48AMविरगाव : वार्ताहर 

विंचूर प्रकाशा राज्यमार्गावर सटाणा शहरापासून १५ किमी अंतरावर ढोलबारे या गावानजीक शिवशाही बस व ट्रेलर यांच्यात सकाळी १०.१५ च्या सुमारास समोरासमोर अपघात झाला.
नाशिक येथून नंदुरबारकडे जाणारी शिवशाही बसर्‍यात अपघातग्रस्त झाली असून यात १५ ते २० प्रवाशी जखमी झाले आहेत. यातील काही प्रवाश्यांची परिस्थिती गंभीर असून त्यांना मालेगाव येथे अधिक उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे.

गत १५ दिवसांच्या कालावधीत परिसरात शिवशाहीचा हा दुसरा अपघात असून यामुळे या बसेस वाहतुकीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.