Sat, May 30, 2020 10:51होमपेज › Nashik › आंतरराष्ट्रीय अश्वसंग्रहालय लवकरच उभा राहणार : मुख्यमंत्री

आंतरराष्ट्रीय अश्वसंग्रहालय लवकरच उभा राहणार : मुख्यमंत्री

Published On: Dec 08 2017 4:21PM | Last Updated: Dec 08 2017 4:21PM

बुकमार्क करा

नंदुरबार : प्रतिनिधी

जगातल्या सर्व प्रकारच्या आणि जातीच्या घोड्यांची जतन करणारे जागतिक पातळीवरचे अश्वसंग्रहालय ऊभारणीचे काम महाराष्ट्र पर्यटन विकास विभागाच्या माध्यमातून हाती घेण्यात आले असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते आज नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे चेतक फेस्टीव्हल दरम्यान अश्वसंग्रहालय भूमीपूजन केल्यानंतर बोलत होते. पर्यटनविकास व रोहयो मंत्री जयकुमार रावल, फेस्टीव्हलचे आयोजक जयपालसिंह रावल, खा. डॉ. हीना गावित, आ. डॉ. विजयकुमार गावित आदी मान्यवर ऊपस्थित होते.