Thu, Nov 15, 2018 22:12होमपेज › Nashik › जामीन मंजूर झाल्यानंतर समीर भुजबळ यांनी छगन भुजबळांची घेतली भेट (video)

जामीन मंजूर झाल्यानंतर समीर भुजबळ यांनी छगन भुजबळांची घेतली भेट (video)

Published On: Jun 07 2018 11:43PM | Last Updated: Jun 07 2018 11:43PMनाशिक : प्रतिनिधी

तुरुंगातून सुटल्यानंतर समीर भुजबळ यांनी थेट मुंबईतील घर गाठत छगन भुजबळ यांची भेट घेतली. यावेळी भुजबळ समर्थकांनी तिथे गर्दी केली होती.

न्यायालयाकडून समीर भुजबळांना जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर आज निकालाची प्रत तुरुंगाधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. त्यानंतर समर्थकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. समीर यांनी मुंबईतील निवासस्थान गाठत काका छगन भुजबळ यांची भेट घेतली.

दरम्यान समीर यांना महाराष्ट्र सोडून जाण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे पुढील एक दोन दिवसात ते नाशिकच्या निवस्थानी येऊ शकतात अशी चर्चा आहे. नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांची जामिनावर मुक्तता झाल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांची प्रतिक्रिया