Fri, Nov 16, 2018 17:08होमपेज › Nashik › रिपब्लिकन ऐक्यासाठी प्रसंगी मंत्रिपदाचा त्याग : आठवले

रिपब्लिकन ऐक्यासाठी प्रसंगी मंत्रिपदाचा त्याग : आठवले

Published On: Mar 03 2018 2:06AM | Last Updated: Mar 03 2018 2:05AMनाशिक : प्रतिनिधी

संविधान बचावासाठीच मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहे. पण, कोणीही उठायचे आणि काहीही बोलायचे. तुम्हाला जे करायचे ते करून मोकळे व्हा. ऐक्य काही जाहीर व्यासपीठावरून बोलून होत नसते, त्यासाठी एकत्र यावे लागेल. त्यासाठी मंत्रिपद सोडण्याची माझी तयारी आहे, अशी घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. 

काळाराम मंदिर सत्याग्रहदिनानिमित्त ईदगाह मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. ‘मी जय भीम करतो नाशिककरांना, लेकिन मेरे भीम के दुश्मनों को हराना’ या चारोळीने भाषणाची सुरुवात करणार्‍या आठवले यांनी भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर नाव न घेता टीका केली. मी आंबेडकरी चळवळीतील भीमसैनिक आहे. बाबासाहेबांचा हाती घेतलेला निळा झेंडा काहींना आवडत नाही. भाजपात जाण्याआधी साहित्यिक, विचारवंतांशी चर्चा केली होती.