Mon, Sep 24, 2018 20:51होमपेज › Nashik › सरकारी कार्यालयापाठोपाठ आता हस्ती बँकेतही चोरी

सरकारी कार्यालयापाठोपाठ आता हस्ती बँकेतही चोरी

Published On: Jan 30 2018 11:11AM | Last Updated: Jan 30 2018 11:11AMनंदुरबार : प्रतिनिधी

येथील हस्ती को आँपरेटीव्ह बँकेत चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याचे आज उघडकीस आले. रहिवाशी घरांमध्ये चोऱ्या होण्याचे सत्र चालू असतांना आणि महामार्ग प्राधिकरण कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, हाँटेल हिरा गार्डन अशा ठिकाणी देखील चोरांनी हात साफ केला. त्यानंतर आता हस्ती बँकेतही चोरीचा प्रकार घडल्याने चोरांनी बँकांनाही लक्ष्य बनवल्याचे स्पष्ट होत आहे.

भरवस्तीत अहिल्या चौकात असलेल्या हस्ती बँकेचे दरवाजे आज मंगळवार रोजी पहाटे उघडे असल्याचे मॉर्निंगवॉकला जाणाऱ्यांच्या लक्षात आले. बँकेच्या वरच्या मजल्यावर झोपलेल्या व्यवस्थापकास ही माहिती याची माहिती देण्यात आली.  त्यानंतर दरोड्याचा प्रयत्न झाल्याचे सकाळी 6 वा. दरम्यान स्पष्ट झाले.

व्यवस्थापकाने तातडीने वरिष्ठांना आणि पोलिसांना पाचारण केले. श्वान पथकाने बँकेच्या मागील बोळीतून महाराष्ट्र व्यायाम शाळा चौकापर्यंत माग काढला. 21 हजार रुपये कँशियरच्या ड्रावरमधून गेल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली. दरम्यान बँकेतील सायरन अनेक दिवसांपासून बंद आहे, असे सांगण्यात आले. प्रत्येक चोरी प्रमाणे या चोरीतही चोरांनी सीसीटीव्हीचे डीव्हीआर चोरून नेले, हे यातले आणखी विशेष आहे. त्या रस्त्यावरील अन्य सीसीटीव्ही कॅमेऱ्याने टीपलेल्या फुटेजची मदत घेतली जात आहे. पंचनामा सुरू आहे.