Mon, Jun 17, 2019 02:14होमपेज › Nashik › नाशिकमध्ये रामनामाच्या जयघोषात रथोत्‍सव (video)

नाशिकमध्ये रामनामाच्या जयघोषात रथोत्‍सव (video)

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पंचवटी : देवानंद बैरागी 

नाशिक महानगरचा ग्रामउत्सव म्हणजे श्रीराम नवमी. त्यानंतर एकादशीस येणारा श्रीराम व गरुड रथोत्सव. श्रीराम  रथोत्सव मंगळवार दि. २७ रोजी संध्याकाळी मोठ्या भक्तिभावाने आणि उत्सहाने साजरा करण्यात आला. राम नामाच्या जयघोषात अवघी नगरी हरपून गेली होती. यावेळी महापौर, उपमहापौर, आमदार, नगरसेवक आदींसह नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

नाशिकमधील चैत्र एकादशीस येणारा श्रीराम आणि गरुड रथोत्सव नाशिककरांसाठी मोठ्या श्रद्धेचा भाग आहे. संध्याकाळी यावर्षीचे पूजेचे मानकरी असलेले पुष्करराजबुवा पुजारी यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. संध्याकाळी सहा वाजता त्यांच्या हस्ते रथ ओढून  रथोत्सवाला सुरुवात करण्यात आली. रथोत्सवासाठी नाशिकच्या महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गीते, आमदार बाळासाहेब सानप, पोलिस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल, पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर, नगरसेवक, राजकीय पदाधिकारी यासह नाशिककरांनी रथाचे दर्शन घेण्यासाठी आणि ओढण्यासाठी एकच गर्दी केली होती.

रथासमोर सनई चौघडा, झांज, ढोल पथक, रथ मार्गावर रांगोळ्या, ठिकठिकाणी भव्य कमानी उभारून परिसर मंगलमय करण्यात आला होता. अनेक मंडळांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. रथाच्या मार्गावर अनेक मंडळानी स्वागत करण्यासाठी स्टेज उभारले होते. गरुड रथाचे रोकडोबा तालीम येथे आगमन झाल्यावर आरती करण्यात आली त्यानंतर गरुड रथ शहराच्या दिशेने मार्गस्थ झाला तर श्रीराम रथ नदी पार करीत नसल्याने तो गौरी पटांगणात उभा राहिला.

रथाचे आगमन रामकुंड येथे झाल्यावर उत्सवमूर्तीची अमृत पूजा, पंचामृत अभ्यंग स्नान, अवभृत स्नान आणि महापूजा  करण्यात आली. रथोत्सवाच्या दिवशी  भाविकांना देखील या उत्सव मूर्तीना स्नान घालण्यासाठी परवानगी दिली जाते. वर्षातील एकच असा हा दिवस असतो की यावेळी काळाराम मंदिरात असलेल्या उत्सव मूर्तींना सामान्य नागरिक स्नान घालू शकतो. रथोत्सवानिमित्त  परिसरात अनेकांनी लहान मुलांसाठी पाळणे, खेळणी, फुगे आदींचे दुकाने थाटल्याने  जत्रचे स्वरूप आले होते.

उत्‍सवात गर्दीचे नियोजन करण्यासाठी सहायक पोलिस आयुक्त विजयकुमार चव्हाण आणि पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी पोलिसांसह चोख बंदोबस्‍त ठेवला होता.
रथोत्सवासाठी काळाराम संस्थान, सरदार रास्ते आखाडा तालीम संघ, अहिल्याराम व्यायाम शाळा आदी ठिकाणचे पदाधिकारी, विश्वस्त आणि कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.
 

Tag : ram navami, garud rathostav, in nashik,


  •