Fri, Feb 22, 2019 00:11होमपेज › Nashik › पद्मावत: नाशिकमध्ये ‘राणा की सेना’ पदाधिकारी स्‍थानबध्‍द 

पद्मावत: नाशिकमध्ये ‘राणा की सेना’ पदाधिकारी स्‍थानबध्‍द 

Published On: Jan 25 2018 2:54PM | Last Updated: Jan 25 2018 2:54PMनाशिक : प्रतिनिधी

संजय लिला भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेला ‘पद्मावत’ चित्रपट सिनेमागृह चालकांनी प्रदर्शित करु नये म्‍हणून निवेदन देण्यात आले. याप्रकरणी 'राणा की सेना'च्या पदाधिकार्‍यांना भद्रकाली पोलिसांनी गुरुवारी (दि. २५) रोजी सकाळपासून थांबवून घेण्यात आले होते.

यामध्ये 'राणा की सेना'चे संस्थापक अध्यक्ष वसंत ठाकूर आदींसह दहा जणांचा यामध्ये समावेश आहे. विशेष म्हणजे देशभरात चित्रपटाला हिंसक पध्दतीने विरोध होत असताना राणा की सेनेच्या पदाधिकार्‍यांनी लोकशाही मार्गाने निवेदन देऊनही त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली.