Tue, Jul 16, 2019 00:17होमपेज › Nashik › जवानांना राखी बांधून जिजाऊ ब्रिगेडचे रक्षाबंधन

जवानांना राखी बांधून जिजाऊ ब्रिगेडचे रक्षाबंधन

Published On: Aug 27 2018 1:17AM | Last Updated: Aug 26 2018 11:28PMनाशिक : प्रतिनिधी

मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडच्या महिला सदस्यांनी नाशिकरोड येथील सैनिक प्रशिक्षण सेंटर येथे  जवानांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. यावेळी आपल्या कुटुंबापासून दूर असणार्‍या जवानांचे राखी बांधतांना बहिणीच्या आठवणीने डोळे पाणावले होते.

नाशिकरोड येथील प्रशिक्षण केंद्र मैदानावर जिजाऊ ब्रिगेडतर्फे प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या सैन्य दलातील जवानांसाठी रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी ब्रिगेडच्या प्रदेश कार्याध्यक्ष माधुरी भदाणे यांनी देशाचे रक्षण करतांना सैनिकांना कुटुंबापासून तसेच सण, समारंभापासून दूर राहावे लागते. सैनिकांचा हा मोठा त्याग असून, त्यामुळेच आपण सुरक्षित आहोत. समाजाने त्याचे भान राखले पाहिजे, असे आवाहन केले.यावेळी ट्रेनिंग मास्टर कमला सोनवाल यांनी जिजाऊ ब्रिगेडने राबविलेला उपक्रम स्तुत्य असून, जवानांना भासणारी बहिणींची उणीव जिजाऊ ब्रिगेडच्या भगिनींनी भरून काढल्याची भावना व्यक्त केली. सुभेदार एस. कुमार,  सुभेदार  जयदेव जोशी यांनी या अनोख्या उपक्रमामुळे आनंद झाल्याचे सांगितले. यावेळी 1 हजारपेक्षा अधिक जवांनाचे जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी औक्षण राख्या बांधल्या. प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष पूजा धुमाळ यांनी केले.  

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सुभेदार व्ही. एन. देशमुख, नगरसेविका वत्सला खैरे, मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष दीपक भदाणे, उपाध्यक्ष नितीन पाटील, कार्याध्यक्ष जितेंद्र पाटील, उदय बोरसे, अरुण पाटील, विशाल देसले उपस्थित होते. अनुपमा मराठे, वैशाली डुंबरे, शीतल गायकवाड, छाया नाडे, मानसी वडघुले, नलिनी शार्दूल, भारती बोरसे, भाग्यश्री बोरसे, कविता पाटील, वंदना भदाणे, वैभवी देसले आदी उपस्थित होते.