Sat, Aug 24, 2019 12:21होमपेज › Nashik › हमीभावासाठी राज्यभरात लाखांचे लाँग मार्च : राजू शेट्टी 

हमीभावासाठी राज्यभरात लाखांचे लाँग मार्च : राजू शेट्टी 

Published On: Jan 21 2018 6:06PM | Last Updated: Jan 21 2018 6:06PMनाशिक : प्रतिनिधी

केंद्र सरकार घटना विरोधी निर्णय घेत असल्याने संविधान धोक्यात आले आहे. या विरोधात येत्या २६ जानेवारीला मुंबई विद्यापीठ ते गेट वे ऑफ इंडिया असा लाँग मार्च काढण्यात येणार आहे. अशी माहिती खासदार राजू शेट्टींनी पत्रकार परिषदेत दिली.

शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करावा, शेती उत्पादनाच्या दीड पट हमीभाव मिळण्यासाठी येत्या काळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विविध शेतकरी संघटनांतर्फे संपूर्ण राज्यात एक लाख शेतकर्‍यांचा लाँग मार्च काढण्यात येणार आहे. अशी माहिती खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली. रविवारी (दि.२१) शेतकरी मेळावा आणि चर्चासत्रासाठी नाशिक येथे शेट्टी आले होते. ते म्हणाले, ‘येत्या काळात मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन होण्याची शक्यता असल्याने केंद्र सरकारने आतापासूनच कांदा निर्यात मुल्य शून्य डॉलर करावे. कारण सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कांद्याला भाव चांगला आहे. यासंदर्भात आपण संसदेत पाठपुरावा करणार आहे. परंतु, कांद्याची आवक वाढून भाव घसरून शेतकरी उध्दवस्त होण्यापूर्वीच सरकारने निर्णय घ्यावा.’

सहकार चळवळ मोडीत काढून साखर कारखाने अत्यंत कमी दरात घेणार्‍यांच्या हातात बेड्या पडल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.