राजधानी एक्स्प्रेस आठवड्यातून ४ दिवस धावणार 

Published On: Sep 12 2019 10:27AM | Last Updated: Sep 12 2019 10:27AM
Responsive image
संग्रहित छायाचित्र


नाशिक : प्रतिनिधी 

दिल्ली प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता आनंदाची बातमी आहे. मुंबई येथून नाशिक मार्गे आठवड्यातून दोन दिवस धावणारी राजधानी एक्स्प्रेस आता आठवड्यातून चार दिवस धावणार आहे. राजधानी एक्स्प्रेसमध्य रेल्वे मार्गावरून धावणार असल्याने दिल्लीवारी करणाऱ्या उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी (दि. १३) सकाळी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते सकाळी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकावर राजधानी एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखविण्यात येणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.

व्यवसाय आणि उद्योगाच्या कामासाठी नाशिक, धुळे, नगर आणि जळगाव या जिल्ह्यांमधून दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या खूप मोठी आहे. या प्रवाशांना याआधी दिल्ली येथे जाण्यासाठी मुंबई येथून राजधानी एक्स्प्रेस पकडावी लागत असे. त्यामुळे वेळेचा आणि पैशांचाही अपव्यय होत असे. राजधानी एक्स्प्रेस मध्यरेल्वेच्या नाशिक मार्गे धावावी यासाठी गेल्या वर्षभरापासून खासदार हेमंत गोडसे प्रयत्नशील होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे काही महिन्यांपासून राजधानी एक्स्प्रेस आठवड्यातून दोन दिवस मध्य रेल्वेच्या नाशिक रेल्वेस्थानकावरून धावू लागली आहे.

राजधानी एक्स्प्रेस दोन तर आठवड्यातून चार दिवस नाशिक मार्गे धावावी, यासाठी खासदार हेमंत गोडसे, खासदार भारतीताई पवार यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला होता.

पाठपुराव्याला आज यश आले आहे. यापूर्वी सीएसटी रेल्वे स्थानकावरून राजधानी एक्स्प्रेस बुधवार आणि शनिवार या दिवस सुटत असे. यापुढे ती सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार असे चार दिवस धावणार आहे. निजामुद्दीन येथून राजधानी एक्स्प्रेस याआधी गुरुवार आणि रविवारी सुटत असे. यापुढे मंगळवार, गुरूवार, शनिवार रविवार आठवडयातील चार दिवस धावणार आहे. या नवीन वेळापत्रकासाठी उद्या, दि. १३ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता सीएसटी रेल्वे स्थानकावर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते राजधानी एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखविण्यात येणार आहे.झारखंडमध्ये मटणावरुन भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; नऊ गंभीर जखमी


हिंदू राष्ट्राची स्थापना करणाऱ्या नित्यानंदविरोधात इंटरपोलची नोटीस


महाविकास आघाडीसाठी सुरवातीला मीच पुढाकार घेतला : दलवाई


तान्हाजी चित्रपटात ‘या’ गावचा उल्लेख न केल्याने ग्रामस्थ संतप्त (video)


पुण्यातील नाईट लाईफवर आदित्य ठाकरेंकडून 'पुणेरी'उत्तर!


गोवा : वाळू व्यवसायिकांनी घेतली दिगंबर कामत यांची भेट


हिंगोली : तीन वर्षाच्या चिमुकलीचा खून करणार्‍या पित्यास जन्मठेपेची शिक्षा


धुळ्यात संशयास्पद मृत्यू, हात पाय बांधून विहिरीत टाकले


३० वर्षांपूर्वी करत होती 'त्याला' डेटिंग; ५२ व्या वर्षी केलं पाचव्यांदा लग्न!


ओबीसी आयोगाला केंद्राची मुदवाढ