Tue, Nov 20, 2018 03:54



होमपेज › Nashik › नाशिक शहराच्या कनेक्टरसाठी पॉईंट ठरवा

नाशिक शहराच्या कनेक्टरसाठी पॉईंट ठरवा

Published On: Dec 29 2017 7:21PM | Last Updated: Dec 29 2017 7:21PM

बुकमार्क करा




नाशिक : प्रतिनिधी

समृद्धी महामार्ग नाशिक शहराला कनेक्ट करण्यासाठी पॉईंट ठरविण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या असून पुढील आठवड्यात त्यासाठी सर्व्हेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष राधेशाम मोपलवार यांनी दिली. राज्यात ३६ टक्के जमीन अधिग्रहण पूर्ण झाले आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा प्रकल्पाला विरोध नसल्याचे दावा त्यांनी यावेळी केला.

जिल्ह्यातील समृद्धी प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी मोपलवार शुक्रवारी (दि. २९) नाशिकमध्ये आले होते. त्याप्रसंगी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. राज्यभरात प्रकल्पासाठीचा विरोध मावळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गत आठवड्यामध्ये नाशिक दौर्‍यात शहरातून घोटीपर्यंत डेडीकेटर कनेक्टर टाकण्याची घोषणा केली होती. त्यानुसार या कनेक्टरबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे. विभागीय आयुक्त या कनेक्टरचा पॉईन्‍ट कुठे असावा हे ठरवतील. त्यांच्याकडून आलेल्या अहवालावर कनेक्टरबाबत पुढील पावले उचलली जाईल.

दरम्यान, हा कनेक्टर पुर्णत: एक्सप्रेस-वे सारखाच असल्याचे सांगत त्यासाठी जमीन अधिग्रहण करायचे की नाही याचा निर्णय प्राथमिक अहवालावरच अवलंबून असल्याचे मोपलवार यांनी सांगितले.
दहा जिल्ह्यांमधील ३४ गावांमधील मोजणीचे काम विरोधामुळे रखडले होते.

मात्र, येत्या काळात संबंधित गावांमधील शेतकर्‍यांशी संवाद साधून मार्ग काढण्यात येईल. दुसरीकडे नाशिकमध्ये आत्तापर्यंत ३० टक्के जमीन अधिग्रहणाचे काम पूर्ण झाले असून जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा या प्रकल्पाला विरोध नसल्याचे मोपलवार यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात आजमितीस 1195.67 पैकी 361.33 हेक्टरचे अधिग्रहण पूर्ण झाले आहे. शेतकर्‍यांना 413 कोटी 26 लाखांचे वाटप करण्यात आले आहे.  दरम्यान, गरज असेल तेथे शेतकर्‍यांशी संवाद साधत या प्रकल्पाबाबत मार्ग काढला जाणार असल्याचे मोपलवार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मोपलवार यांनी जिल्ह्यातील दोन्ही तालुक्यातील गावनिहाय प्रकल्पाचा आढावा घेतला.

कामाला 1 मार्चपासून प्रारंभ

राज्यातील 10 जिल्ह्यांमधील 8 हजार 431 हेक्टर खासगी जमीन प्रकल्पासाठी संपादित करावी लागणार आहे. त्यापैकी आत्तापर्यंत 3 हजार 113 हेक्टर जमीनीचे (36 टक्के) अधिग्रहण पूर्ण झाले आहे. बाधित शेतकर्‍यांच्या खात्यावर 2 हजार 800 कोटी रूपये जमा केल्याची माहिती मोपलवार यांनी दिली. दरम्यान,4 हजार 799 हेक्टर जमीन देण्यासाठीचे शेतकर्‍यांनी संमतीपत्र दिले आहे. येत्या दोन महिन्यात अधिकधिक जमीन अधिग्रहीत करतानाच 1 मार्च रोजी प्रत्यक्ष कामाला प्रारंभ करण्यात येईल, असेही मोपलवार यांनी सांगितले.

मी कामाला महत्व देता
ज्या कथित ध्वनीफितीवरून माझ्यावर आरोप करण्यात आले होते, त्याबाबत अद्यापही कोणी पुरावे देऊ शकलेले नाही. बोरीवलीमधील ज्या प्लॉटवरून माझ्यावर आरोप झाले होते ते बघता प्रत्यक्षात जागेवर असा कोणताच प्लॉट नसल्याचे मोपलवार दावा मोपलवार यांनी केला. चौकशीत सत्य समोर आले आहे. त्यामूळे या गोष्टीवर पडदा पडला असून मी कोणावरही कारवाईची मागणी करणार नसल्याचे स्पष्ट करत कारण मी कामाला महत्व देत असल्याचे त्यांनी सांगितले.