Thu, Aug 22, 2019 03:51होमपेज › Nashik › रासाका कामगारांच्या ‘पीएफ’वर डल्ला

रासाका कामगारांच्या ‘पीएफ’वर डल्ला

Published On: Dec 11 2017 1:59AM | Last Updated: Dec 11 2017 1:58AM

बुकमार्क करा

काकासाहेबनगर : वार्ताहर

 ‘रासाका’ अर्थात कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांच्या केंद्र सरकारच्या भविष्य निर्वाह निधीत (पीएफ) विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी डिसेंबर 2014 ते एप्रिल 2015 या कालावधीत कामगारांच्या वेतनातून रकमा कपात करूनही भविष्य निर्वाह निधीत न भरता केंद्र सरकारची व कामगारांची फसवणूक करत एक कोटी 26 लाख 80 हजार 468 रुपयांचा अपहार करून ती रक्कम हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र, याबाबत कामगारांनी कुठेही तक्रार दिली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

भविष्य निर्वाह निधीची रक्कम खात्यात भरली न गेल्याने निवृत्त कामगारांना पेन्शन योजनेपासून वंचित राहावे लागत असून, कामगारांच्या भवितव्याशीच खेळण्याचा हा प्रकार उघडकीस आल्याने रासाका परिसरात खळबळ उडाली आहे. ऐन हिवाळी अधिवेशन काळात हे प्रकरण उघडकीस आल्याने विरोधक काय भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे झाले आहे. ‘रासाका’ 2012 पासून भाडे करारावर घेतल्यापासून बंदच आहे. औरंगाबाद येथील छत्रपती संभाजीराजे साखर उद्योग हा साखर कारखाना सुरू ठेवून रासाकाचे भांडवल या कारखान्यास वापरण्यात येत आहे. कामगारांचे पगार, ऊस उत्पादक आदींचे वेळेवर पैसे देऊन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे व विठ्ठलराव अंबरवाडीकर हे सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.