Sun, Mar 24, 2019 06:14होमपेज › Nashik › लहुजी सेनेच्या वतीने रास्‍ता रोको  

लहुजी सेनेच्या वतीने रास्‍ता रोको  

Published On: Mar 01 2018 1:31AM | Last Updated: Feb 28 2018 12:22PMसिड्को : वार्ताहर

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व लहुजी वस्ताद साळवे यांच्या तैल चित्राची विटंबना केल्‍याच्या निषेधार्थ गरवारे पॉइंट येथे लहुजी सेनेच्या वतीने रास्‍ता रोको आंदोलन केले. अकोला जिल्ह्यातील उमरी येथे अण्णाभाऊ साठे व लहुजी वस्ताद साळवे यांच्या तैल चित्राची विटंबना झाल्‍याचा प्रकार घडला होता. 

या वेळी लहुजी शक्ति सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष बालू आठवले, रवी अड़ागळे, दशरथ बलसाने, विष्णु वाकळे, संतोष कार्डिले, संदीप कपरे, संतोष आठवले, प्रविण जाधव उपस्थित होते.

रास्ता रोको आंदोलन केल्या प्रकरणी अंबड पोलिसांनी आदोंलन कर्त्याना ताब्यात  घेतले. काही वेळानंतर त्‍यांना सोडून देण्यात आले.