Sat, Feb 23, 2019 04:01होमपेज › Nashik › राज्यभरातील २९ सहायक निरीक्षकांना बढती

राज्यभरातील २९ सहायक निरीक्षकांना बढती

Published On: Feb 18 2018 2:00AM | Last Updated: Feb 18 2018 12:46AMनाशिक : प्रतिनिधी 

राज्यभरातील 29 सहायक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षकपदी शनिवारी (दि.17) बढती देण्यात आली. पदोन्नतीच्या कोट्यातील खुल्या प्रवर्गातील रिक्‍त जागा तात्पुरत्या स्वरूपात सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर विभागीय पदोन्नती समितीतर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे. 

पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी पोलीस दलातील निरीक्षकपदाच्या या रिक्‍त जागा भरण्यासाठी प्रयत्न केले. 29 डिसेंबर 2017 च्या शासन निर्णयानुसार पदोन्नतीच्या कोट्यातील खुल्या प्रवर्गातील रिक्‍त पदे तात्पुरत्या स्वरूपात भरण्यासाठी सेवाज्येष्ठतेचा निकष तपासण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आरक्षण नसलेल्या खुल्या प्रवर्गातील तसेच इतर मागासवर्गीय प्रवर्गातील निशस्त्र सहायक निरीक्षकांना पोलीस निरीक्षकपदी तात्पुरत्या स्वरूपात बढती देण्यात आली.

त्यानुसार राज्यातील मुंबई, सातारा, नागपूर, धुळे, नाशिक, पालघर, उस्मानाबाद, नगर, अमरावती, चंद्रपूर, पुणे, जालना, विशेष सुरक्षा विभाग येथील एकूण 29 सहायक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षकपदी बढती देण्यात आली आहे. त्यातील नागपूर शहरातील रामचंद्र जगन्नाथ बांदेकर, मुंबईतील विजय श्यामराव ढमाळ यांची नाशिक शहरात पदोन्नतीने बदली झाली आहे. त्याचप्रमाणे पुणे ग्रामीणचे नंदकुमार रामहरी गायकवाड यांची धुळे येथे तर नगरचे अरुण भागीरथ परदेशी यांना नगरलाच पदोन्नती देण्यात आली आहे. 

पदोन्नती मिळालेल्या पोलिसांची नावे (कंसात बदलीचे ठिकाण)

अमर चंद्रकांत नलवडे (सातारा), प्रल्हाद बन्सीपंत घोडके (औरंगाबाद शहर), विवेक शांताराम सोनावणे (पालघर), नंदकुमार विष्णू दुधाळ (मुंबई), अभिमन्यू अर्जुन पाटील (मुंबई), महंमद रफिक अबुबकर जमादार (मुंबई), विजय अर्जुन पाटील (मुंबई), मधुकर हरिश्‍चंद्र चौधरी (मुंबई), सुनील रामचंद्र खटावकर (मुंबई), नंदकिशोर विष्णू तावडे (मुंबई), राजेंद्र नारायण निकम (मुंबई), अजित दत्ताराम जाधव (मुंबई), संजय सदाशिव सागवेकर (मुंबई), ज्ञानदेव भीमराव बजबळकर (मुंबई), दिलीप दत्तात्रय लांडगे (नागपूर), संतोष दत्ताराम सावंत (अमरावती शहर), दिगंबर भवानी शिंदे (पुणे शहर), अरुण भागीरथ परदेशी (नगर), संदीप शांताराम शिवले (नांदेड), बाळकृष्ण नारायण चव्हाण (मुंबई), रामचंद्र जगन्नाथ बांदेकर (नाशिक), राजेंद्र चंद्रकांत सावंत (नागपूर शहर), अनिरुद्ध सोपानराव काकडे (नांदेड), धनंजय महादेवराव सायरे (यवतमाळ), संजय मोतीलाल जव्हेरी (अमरावती शहर), नंदकुमार रामहरी गायकवाड (धुळे), नितीन दिगंबर काकडे (नागपूर शहर), विजय श्यामराव ढमाळ (नाशिक शहर), मच्छिंद्र तुकाराम सुरवसे (नांदेड).