Mon, Mar 25, 2019 09:20होमपेज › Nashik › माध्यमिक शिक्षकांच्या पदोन्‍नतीचा मार्ग मोकळा

माध्यमिक शिक्षकांच्या पदोन्‍नतीचा मार्ग मोकळा

Published On: Mar 20 2018 1:49AM | Last Updated: Mar 20 2018 12:09AMसिन्‍नर : प्रतिनिधी

जिल्हाभरातील माध्यमिक शिक्षकांच्या पदोन्‍नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. अनेक दिवसांपासून शिक्षकांच्या पदोन्‍नतीचा प्रश्‍न प्रलंबित होता. मुख्याध्यापक संघाच्या पाठपुराव्याला यश आले आहे. येत्या आठवडेभरात मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, डीएड टू बीएड प्रमोशन मान्यता देण्याचे आश्‍वासन जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी दिले.

नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघासोबत झालेल्या संयुक्‍त सहविचार सभेत ते बोलत होते. सभेत प्लॅन नॉनप्लॅनच्या बिलांचे एकत्रीकरण, 20 टक्के अनुदान शाळांची बिले, सर्व मेडिकल बिलांना मंजुरी राहिलेल्या कर्मचार्‍यांनी 20/3/2018 पर्यंत मेडिकल बिले द्यावी, मुख्याध्यापकांसाठी माहिती अधिकार कार्यशाळा, डीसीपीएस योजना वसुली  थांबवून कोर्टाच्या आदेशाचे पालन करणे, ग्रंथपाल पे फिक्सेशन, शिक्षणाधिकार्‍यांची स्वाक्षरी करणे, मुख्याध्यापक संघ व सर्व संघटनांचे दोन प्रतिनिधी घेऊन एप्रिलपर्यंत सुट्यांची यादी जाहीर करणे, आयसीटी लॅबचा तिसरा टप्पा जून-2018 मध्ये मिळणार (आरएमएसए)कडून सर्वेक्षण करणे आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी संघाचे मार्गदर्शक सुरेश शेलार, गुफरान अन्सारी, अध्यक्ष एस. के. सावंत, कार्याध्यक्ष एस. बी. शिरसाठ, सचिव एस. बी. देशमुख, माणिक मढवई, बी. के. शेवाळे, बी. वाय. पाटील, राजेंद्र सावंत, परवेझा शेख, शुभलक्ष्मी कुलकर्णी, बी. डी. गांगुर्डे, किशोर पालखेडकर, दीपक ह्याळीज, अशोक कदम, चंद्रकांत शेलार, एम. व्ही. बच्छाव, योगेश पाटील, डी. एस. ठाकरे, के. टी. उगलमुगले, इरफान शेख, आर. टी. जाधव, बाबासाहेब खरोटे,  मनोज वाकचौरे, राजेंद्र लोंढे, एस. ए. पाटील, टी. एम. डोंगरे, डी. पी. जाधव, ए. आर. पवार, आर. आर. मवाळ, डी. जी. शिंदे, अशोक मोरे आदी उपस्थित होते. आता पदोन्‍नतीचा मार्ग मोकळा झाल्याने शिक्षकांनी समाधान व्यक्‍त केले आहे.

शिक्षण अधिकारी नितीन बच्छाव यांच्या भूमिकेमुळे जिल्हाभरातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे. बच्छाव यांच्यासोबतच सकारात्मक चर्चा सुरू आहे. भविष्यात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचे प्रश्‍न निश्‍चितच मार्गी लागतील, असा विश्‍वास आहे.   - एस. बी. देशमुख, कार्यवाह, मुख्याध्यापक संघ

 

Tags : Nashik, Nashik news, secondary teachers, promotion,