Thu, Apr 25, 2019 12:00होमपेज › Nashik › ‘कालिदास’चा पडदा उघडण्यापूर्वीच श्रीगणेशा 

‘कालिदास’चा पडदा उघडण्यापूर्वीच श्रीगणेशा 

Published On: Jul 13 2018 12:50AM | Last Updated: Jul 12 2018 11:55PMनाशिक : प्रतिनिधी

महाकवी कालिदास कलामंदिराच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्याने हे नाट्यगृह सध्या उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. परंतु, हा उद्घाटनाचा पडदा उठण्यापूर्वीच मनपा आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी नाट्यगृहात आज (दि.13) शहरातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या अध्यक्ष, सचिव मुख्याध्यापकांची बैठक बोलविली आहे. यामुळे या बैठकीच्या निमित्ताने आयुक्‍तांनी उद्घाटनापूर्वीच श्रीगणेशा करण्याचे ठरविले आहे. 

तब्बल साडेनऊ कोटी रुपये खर्च करून स्मार्ट सिटी योजने अंतर्गत महाकवी कालिदास कलामंदिराचे नूतनीकरण करण्यात आले आहे. नूतनीकरणाचे हे काम पूर्ण झाल्याने त्याचे उद्घाटन करण्यासाठी सत्ताधारी भाजपातील पदाधिकारी उतावीळ झाले आहे. तसेच, नाट्य परिषद व ज्येष्ठ कलावंतांमध्येही उद्घाटनाविषयी मोठे कुतूहल निर्माण झालेले आहे. असे असताना कालिदासच्या खासगीकरणाविषयी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू करण्यात आले. त्यास कलावंत, नाट्यसंस्था व नाट्य परिषदेकडून तीव्र स्वरूपाचा विरोध केला गेला.