होमपेज › Nashik › नाशिक : खासगी बसला अपघात, ३ ठार, २२ जखमी  

नाशिक : खासगी बसला अपघात, ३ ठार, २२ जखमी  

Published On: May 02 2018 10:35AM | Last Updated: May 02 2018 10:37AMनाशिक : प्रतिनिधी

सुरगाणा तालूक्यातील बोरगाव जवळील गायदर घाटात लक्झरी बस दरीत कोसळून ३ जण ठार झाले आहेत तर, २२ प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये २ महिला आणि एका बालकाचा समावेश आहे. जखमींना बसमधून बाहेर काढण्यात आले असून, त्‍यांना उपचारासाठी रूग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे. 

अपघाती बस नवसारी येथून शिर्डीला जात होती. उंबरपाडा येथील चेकपोस्ट वरील टोल चुकविण्यासाठी चालकाने बसचा मार्ग बदलला होता. गायदर घाटत बस आल्‍यानंतर चालकाचा बसवरील ताबा सुटल्‍याने बस रस्‍ता सोडून घाटात कोसळी. बुधवारी पहाटे तीन वाजता हा अपघात झाला. यात तीन प्रवाशांचा जागीच मृत्‍यू झाला तर, २२ प्रवाशी जखमी झाले. जखमींना बसमधून बाहेर काढले आहे. मात्र, एक लहान मुलगा बसमध्ये अडकला आहे. त्‍याला बाहेर काढण्यासाठी गँस कटरने बसचा पत्रा कापण्याचे काम सुरु असल्‍याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.  

Tags : private travels, accident, nashik district surgana taluka