Sun, Jan 20, 2019 06:43होमपेज › Nashik › वकिली सांभाळून अभिनयाची ‘प्रेरणा’

वकिली सांभाळून अभिनयाची ‘प्रेरणा’

Published On: Mar 08 2018 12:24AM | Last Updated: Mar 08 2018 12:12AMनाशिक :गौरव अहिरे

प्रेक्षकांना निखळ आनंदासह कायद्याचे ज्ञान देण्यासाठी नाशिकच्या महिला वकिलाने आगळेवेगळे क्षेत्र निवडले आहे. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या अ‍ॅड. प्रेरणा देशपांडे यांनी एकपात्री प्रयोग सादर करून श्रोत्यांना आनंद देण्यासोबतच कायद्याचे ज्ञानही देत आहेत. 
एकपात्री नाटक म्हटले की, कलाकार एकच, मात्र भमिका अनेक! त्यामुळे सादरकर्ता त्याच तोडीचा आणि सक्षम असणे महत्त्वाचे असते. नाशिकमधील अ‍ॅड. प्रेरणा देशपांडे या देखील त्यांच्यापैकीच एक.

त्यांनी आजपर्यंत ‘तुला शिकवीण चांगलाच धडा’, वर्हाडी ठसका, सीता, झाशीची राणी आदी एकपात्री प्रयोग त्या सादर करतात. अ‍ॅड. प्रेरणा यांनी राष्ट्र सेवा दलातून लोकनाट्याच्या माध्यमातून विविध सामाजीक प्रश्‍न हाताळले. ‘मर्चंट ऑफ व्हेनीस’ या नाटकात वकिलाची भूमिका करताना त्यांनी वकिलीचा अभ्यास केला. ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’, ‘संसार माझा सोन्याचा’ या चित्रपटांतही अ‍ॅड. प्रेरणा यांनी भूमिका साकारली आहे. त्याचप्रमाणे मराठी, हिंदी नाटकांमध्येही त्यांनी काम केले असून या कामाची दखल राज्य नाट्य स्पर्धा, कामगार कल्याण मंडळाच्या स्पर्धांचे पुरस्कार त्यांना मिळाले आहे.