Fri, Apr 26, 2019 09:47होमपेज › Nashik › ‘त्याचे गौड बंगाल मला अजूनही कळले नाही’

‘त्याचे गौड बंगाल मला अजूनही कळले नाही’

Published On: Jun 07 2018 4:45PM | Last Updated: Jun 07 2018 5:18PMनाशिक उपनगर : वार्ताहर

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या शेवटच्या दिवशी १४ इच्छुकांनी अर्ज दाखल केले. यातील काही उमेदवारांनी रिस्क नको म्हणून दोन अर्ज भरून ठेवले आहे. मात्र निवडणुकीच्या रिंगणातले खरे खिलाडी ११ जून नंतर समजणार आहेत. ११ जूनला अर्ज माघारीचा दिवस असल्याने खरे चित्र १२ जून ला स्पष्ट होणार आहे.

विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात माजी खासदार प्रताप सोनावणे यांनी अर्ज भरल्याने राजकीय वतुळात चर्चा रंगली आहे. अर्ज भरल्यानंतर भाजपने तुम्हाला उमेदवारी का दिली नाही ? या प्रश्नाला उत्तर देताना प्रताप सोनावणे म्हणाले कि  त्याचे गौड बंगाल मला अजूनही कळाले नाही , या बाबत माझाच अभ्यास व्हायचा आहे. शिक्षक लोकशाही आघाडीचे चार तुकडे झाले आहे. माझा आणि शिक्षक मंडळींचा अतीशय जिव्हाळ्याचे नाते आहे.जे काही मी आहे ते गुरुजानांमुळे आहे. म्हणून मी निवडणूक लढवीत असल्याचेही प्रताप सोनावणे यांनी सांगितले.

दरम्यान अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ३१ इच्छुकांनी ८४ अर्ज नेले असून त्यात काही लोकांनी दोनदा अर्ज दाखल केले आहे.अर्ज भरण्याच्या पहिल्या दिसापासून तर  शेवटच्या दिवसापर्यत एकूण २५ लोकांनी अर्ज भरलेले असून त्यामध्ये सुनील पंडित(नगर), माजी खासदार प्रताप दादा सोनवणे(नाशिक),महादेव साहेबराव चव्हाण (नाशिक)दिनेश देवरे (नाशिक),शेख मुख्तार अहमद(मालेगाव),अजितराव किसान दिवटे(अहमदनगर),सुनील रमेश बच्याव(नाशिक),कुणाल नरेंद्र दराडे(नाशिक),महेश भिका शिरुडे(नाशिक),विठल रघुनाथ पानसरे(नगर),अशोल शंकर पाटील (धुळे),प्रकाश हिला सोनावणे(नाशिक)या उमेदवारांनी शेवटच्या दिवशी अर्ज दाखल केले आहेत.  

अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विभागीय कार्यालयात उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अर्ज भरण्यासाठी गर्दी केली होती.उद्यापासून (८ जून) अर्ज छाननी ला सकाळी ११वाजता सुरुवात होणार असून ४ वाजेपर्यंत चालणार आहे. अर्ज छाननी मध्ये उमेदवाराने अर्जात दिलेली माहिती पहिली जाणार आहे. अर्जदाराच्या बाबतीत लेखी हरकत घेतली तर त्या हरकतीची चौकशी करून निर्णय घेतला जाईल असे उपयुक्त रघुनाथ गावंडे यांनी सांगीतले. ११ जून ला माघारीचा शेवटचा दिवस असून किती लोक माघार घेतात या कडे शिक्षक मतदारांचे लक्ष लागलेले आहे.