Wed, Jul 17, 2019 08:50होमपेज › Nashik ›  चोरट्यासह बालगुन्हेगार ताब्यात

 चोरट्यासह बालगुन्हेगार ताब्यात

Published On: Jan 21 2018 2:51AM | Last Updated: Jan 21 2018 1:20AMपंचवटी : वार्ताहर

बालगुन्हेगारासह एकास ताब्यात घेऊन त्याच्याकडून बनावट नंबर प्लेट असलेली चोरीची दुचाकी तर बालगुन्हेगाराकडून लहान मुलांच्या सात सायकली हस्तगत करण्यात म्हसरूळ पोलिसांना यश आले आहे. या सायकली मूळ मालकांना देण्यात आल्या आहेत.

म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना गुन्हे शोधपथकाचे कर्मचारी येवाजी महाले,संदीप भांड, सोमनाथ शार्दूल, प्रशांत वालझाडे, उत्तम पवार यांना तारवालानगर येथील लामखेडे मळा परिसरात राहणारा संशयित वैभव नरवाडे हा पॅशन प्रो मोटारसायकलवर (क्र.एमएच15. इझेड 9211) संशयास्पदरित्या फिरताना आढळून आला. त्याच्याकडे दुचाकीविषयी चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच, कागदपत्रे दाखविण्यास टाळाटाळ केली.म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख यांनी दुचाकीच्या चेसी आणि इंजिन नंबरवरून दुचाकीच्या मालकाचा शोध घेतला असता ही दुचाकी मधुकर आत्माराम पगार (54, रा. उत्तम अपार्टमेंट,हिरावाडी ,पंचवटी)यांची असून, ती चोरीला गेली असल्याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली असल्याचे उघड झाले. यावरून त्यांनी या संशयितांकडून  मोटारसायकल जप्त करून त्याच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 

 तसेच, गुन्हे शोधपथकाचे कर्मचारी एस. डी. राऊत,संजय पवार, मंगेश दराडे, राजू टेमगर,काका रोकडे यांनी गस्त घालत असताना एका बालगुन्हेगाराला ताब्यात घेऊन त्याच्याकडून लहान मुलांच्या 40 हजार रुपये किमतीच्या सात सायकली जप्त केल्या. यातील पाच सायकलींच्या मालकांची ओळख पटली असून, त्या ताब्यात देण्यात आल्या आहेत.