Wed, Nov 21, 2018 23:34होमपेज › Nashik › माजी नगरसेवक प्रशांत मोरेची पोलिसांनी काढली धिंड

माजी नगरसेवक प्रशांत मोरेची काढली धिंड

Published On: Jun 12 2018 8:20PM | Last Updated: Jun 12 2018 8:20PMनाशिकरोड :  वार्ताहर 

माजी नगरसेवक प्रशांत मोरे याच्यासह सहकार्याची उपनगर पोलिसांनी मंगळवारी ( १२ ) हाणामारी प्रकरणात धिंड काढली. यापूर्वी दुसऱ्या गटातील संशयितांची धिंड काढली होती.

नाशिक-पुणे महामार्गावरील आंबेडकरवाडी येथे माजी नगरसेवक प्रशांत मोरे आणि कुणाल साळवे यांच्या गटात झालेल्या हाणामारीत तिघे जण जखमी झाले होते. हाणामारी प्रकरणाने आंबेडकरवाडी, समता नगर आदी परीसरातील सामान्य नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. दहशत दूर करण्यासाठी पोलिसांनी दोन्ही गटांची धिंड काढली. यामुळे काही प्रमाणात दहशत दूर होण्यास मदत मिळणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. यावेळी उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

दोन्ही गटांनी परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. वाढदिवसाचा केक कापण्याच्या वादातून हाणामारी झाल्याचे बोलले जात आहे.