Tue, Jul 23, 2019 17:03होमपेज › Nashik › चार पोलीस कर्मचार्‍यांना अवघे शंभर रुपयांचे बक्षीस

चार पोलीस कर्मचार्‍यांना अवघे शंभर रुपयांचे बक्षीस

Published On: Feb 10 2018 1:35AM | Last Updated: Feb 10 2018 12:12AMनाशिक : प्रतिनिधी 

नाशिक परिक्षेत्रातील पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी चार पोलीस कर्मचार्‍यांना जीएसटी वजा करून शंभर रुपयांचे बक्षीस भेट देऊन एक प्रकारे थट्टा केली आहे. चौबे यांच्या मुलीच्या आजारपण काळात पोलीस कर्मचार्‍यांनी चांगली सेवा केली. त्यामुळे त्यांना शंभर रुपये देण्यात आले. याबाबत संबंधित पोलीस अधिकार्‍यांना विचारले असताना त्यांनी मात्र भाष्य करण्यास नकार दिला.

पोलीस हवालदार संजय खराटे, आसिफ उमर शेख, मारुती सटवा पांडलवाड आणि किरण देवराम नागरे अशी चार पोलीस कर्मचार्‍यांची नावे आहेत. पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांच्या मुलीच्या आजारपणाच्या काळात या चार पोलीस कर्मचार्‍यांनी चांगली सेवा बजावली. त्यामुळे चौबे यांनी पोलीस कर्मचार्‍यांचा सन्मान करण्याचे ठरवले. मात्र, शंभर रुपये देऊन बक्षीस दिले की थट्टा केली हा प्रश्‍न उपस्थित होत आहे. दरम्यान, पोलीस अधिकार्‍यांना याबाबत विचारले असता ती प्रिंटिंग मिस्टेक असल्याचे सांगून त्यांनी या प्रकरणातून हात झटकले आहेत. शिवाय रुग्णालयाच्या कामासाठी नाही, तर कार्यालयीन कामासाठी बक्षीस दिल्याचा दावा अधिकार्‍यांकडून करण्यात आला आहे.