जळगाव : पुढारी ऑनलाईन
जळगाव पोलिस दलात कार्यरत असणार्या एका पोलिस कर्मचार्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे खळबळजनक घटना घडली आहे. रुपेश विश्वनाथ पाटील असे मृत कर्मचार्याचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नसून रामानंद पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रुपेश हे २०१२ मध्ये जळगाव पोलिस दलांत दाखल झाले होते. त्यांची नियुक्ती यावल पोलिस ठाण्यात होती. जळगावमधील शिव कॉलनीत ते भाड्याच्या घरात राहत होते. त्यांच्या सोबत आई, पत्नी, मुलगा व भाऊ सर्वजण येथे राहत होते. आज सकाळी रूपेश यांनी राहत्या घरात गळफास घेतल्याचे उघडकीस आले. त्यानंतर याप्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली.
रुपेश हा अतिशय मनमिळावू आणि प्रेमळ स्वरुपाचा होता, अशी माहिती त्याच्या सहकार्यांनी दिली. तसेच आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस अधिक तपास करत आहेत.