Tue, May 21, 2019 04:51होमपेज › Nashik › वावी पोलीस ठाण्याच्या आवारातच घेतले विष

वावी पोलीस ठाण्याच्या आवारातच घेतले विष

Published On: May 18 2018 1:18AM | Last Updated: May 17 2018 11:35PMवावी : वार्ताहर

वावी, ता. सिन्नर येथील पोलीस ठाणे आवारात एकाने कौटुंबिक वादातून विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी 12 च्या सुमारास घडली. अचानकपणे घडलेल्या या घटनेमुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मच्छिंद्र रामभाऊ माळी (45) यांनी दुपारी वावी पोलीस ठाण्यात येऊन कौटुंबिक वादाची माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी विषप्राशन केलेले असल्याने त्यांना व्यवस्थित बोलता येत नव्हते. मात्र, बायको माझ्याबरोबर येत नसल्याच्या कारणावरून आपण विषप्राशन केल्याचे ते पोलिसांना सांगण्याचा प्रयत्न करत होते. त्यांची अवस्था पाहून पोलिसांनी त्यांना तात्काळ दोडी रुग्णालयात पाठविले. मात्र, विषप्रशान करून बराचवेळ झाल्याने तेथील डॉक्टरांनी त्यांना तत्काळ नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यास सांगितले त्यावर पोलिसांनी त्यांना नाशिकला हलविले असता रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

माळी हे अकोला तालुक्यातील वीरगाव येथील रहिवासी असून, ते व्यवसायानिमित्त वैजापूर येथे असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत वावी पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत कोणताही गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता. मात्र, त्यांनी विष का घेतले याबाबत शंका  उपस्थित केली जात आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक रणजित आंधळे करीत आहे.