Tue, Jul 16, 2019 10:14होमपेज › Nashik › कुस्तीमध्ये पिंपळगावच्या पोरींची झेप

कुस्तीमध्ये पिंपळगावच्या पोरींची झेप

Published On: Jan 09 2018 1:35AM | Last Updated: Jan 08 2018 11:19PM

बुकमार्क करा
पिंपळगाव बसवंत : वार्ताहर

पिंपळगाव बसवंतसारख्या बागायतदार व व्यापारी पेठ असलेल्या गावानेे आता क्रीडा क्षेत्रातही नावलौकिक केला आहे. पिंपळगावच्या मा. ल. जाधव कन्या विद्यालयाने शिक्षण क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटवला आहे. पुढे जाऊन आता मुलींना कुस्तीच्या आखाड्यात तरबेज करण्याचे कार्य हाती घेत आम्ही कमी नाही, हेच दाखवून दिले आहे. या विद्यालयाचा दहावीचा निकाल 90 टक्के लागला असून, यामध्ये 27 मुली 90 टक्क्यांच्या पुढे आहे. याच शाळेतील बेसबॉल, कराटे क्षेत्रात राज्यभर नाव कमावले आहे. आता वर्षभरापासून कुस्त्यांच्या आखाड्यातही मुलींनी बाजी मारली असून, सात मुली आता राज्यपातळीवर खेळत आहे.

आळंदी येथे झालेल्या स्पर्धांमध्ये कोमल ससाणे, वैष्णवी पावले, रेणुका जाधव, मनीषा सिंग, अश्‍विनी दाभाडे यांची निवड झाली आहे. यावर्षी भारती भुसाळ, मनीषा सिंग, कोमल ससाणे, रुक्मिणी सगट, सुरेखा ठाकरे, प्रांजल वाबळे सरावासाठी उतरल्या आहेत. आताच सिन्नर येथे झालेल्या कुस्ती अधिवेशनात वैष्णवी पावले हिने 55 किलो वजन गटात प्रथम पारितोषिक मिळवले. पिंपळगाव बसवंत महाविद्यालयात महिलांच्या गटात कुस्तीचे पहिले बक्षीस मिळवणारी पहिली विद्यार्थी म्हणून तिची नोंद झाली. उत्तर महाराष्ट्र कुस्ती स्पर्धांमध्ये कोमल ससाणेला दुसरा क्रमांक आला. मनीषा सिंग हिने राज्यपातळीवर धडक मारली. या यशाबद्दल बाळासाहेब जाधव, संजय मोरे, नानासाहेब बोरस्ते, मुख्याधापक आहेर यांनी शुभेच्छा दिल्या.