Fri, Sep 20, 2019 04:44होमपेज › Nashik › ‘अजित पवारच खडसेंसोबतच्या कानगोष्टी उघड करतील’

‘खडसेंसोबतच्या कानगोष्टी पवारच उघड करतील’

Published On: Dec 31 2017 11:18AM | Last Updated: Dec 31 2017 11:09AM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ  खडसे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यात काय कानगोष्टी झाल्या हे पवारच उघड करतील. त्याची मलाही उत्सुकता असल्याचे सांगत  नाशिक दौर्‍यावर आलेले पालकमंत्री गिरीश महाजन यांनी या  विषयावर अधिक बोलणे टाळले.

जळगाव येथे दोन दिवसांपूर्वी एका जाहीर कार्यक्रमात खडसे आणि पवार हे एकाच  व्यासपीठावर एकत्रित आले होते. व्यासपीठावर खडसेंनी पवार यांच्या कानात काही गोष्टी सांगितल्या. या कानगोष्टींची राज्यभरात चर्चा सुरू आहे. खडसेंनी काही महत्वाच्या बाबी सांगितल्याचे स्पष्ट करत योग्यवेळी त्या उघड करण्याचे सूतोवाच अजित पवार यांनी नुकतेच केले. त्यामुळे हे प्रकरण आणखीच चर्चेत आले आहे. 

दरम्यान, जिल्हा  योजन बैठकीसाठी शनिवारी नाशिकमध्ये आलेल्या पालकमंत्री महाजन यांना या मुद्यावरून पत्रकारांनी छेडले. त्यावेळी महाजन यांनी सावध पवित्रा घेत अजित पवार यांच्या  कानात नाथाभाऊ काय बोलले, हे माहिती  नाही. तसेच, याबाबत पवारच खुलासा करणार असून, ते कधी करतील याची सर्वसामान्यांप्रमाणेच मलाही उत्सुकता आहे. त्यामुळेच योग्य वेळेची प्रतीक्षा करावी, असा  सल्ला पालकमंत्री महाजन यांनी दिला. नाशिक महापालिकेतील पदाधिकार्‍यांच्या दबावामुळे अधिकारी स्वेच्छानिवृत्ती घेत असल्याच्या तक्रारी असल्याबद्दल  महाजन यांना प्रश्‍न विचारण्यात आला. त्यावर अशा कोणतही तक्रार नसून तसे काही असल्यास संबंधितांनी थेट माझ्याशी संपर्क  साधावा, असे महाजन यांनी सांगितले. दरम्यान, अशा काही तक्रारी आल्यास त्याबाबत  गांभीर्याने विचार करण्यात येईल, असे यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.   WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex