Mon, May 20, 2019 08:00होमपेज › Nashik › येवल्यात कांदा आवक टिकून

येवल्यात कांदा आवक टिकून

Published On: Jan 07 2018 2:03AM | Last Updated: Jan 06 2018 11:58PM

बुकमार्क करा
येवला : प्रतिनिधी

सप्ताहात येवला व अंदरसूल मार्केट यार्डवर लाल कांद्याची आवक टिकून होती, तर बाजारभाव तेजीत असल्याचे दिसून आले.

कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, पश्‍चिम बंगाल आदी राज्यांत व परदेशात दुबई, मलेशिया, कोलंबो व सिंगापूर आदी ठिकाणी मागणी चांगली होती. सप्ताहात एकूण कांदा आवक 62699 क्‍विंटल झाली असून, लाल कांद्याचे बाजारभाव किमान रु. 1500 ते रु. 3640, तर सरासरी रु. 3400 प्रतिक्‍विंटलपर्यंत होते. तसेच उपबाजार अंदरसूल येथे कांद्याची एकूण आवक 44810 क्‍विंटल झाली असून, लाल कांद्याचे बाजारभाव किमान रु. 1500 ते कमाल रु. 3712, तर सरासरी रु. 3400 प्रतिक्‍विंटलपर्यंत होते.