Mon, Jun 24, 2019 20:56होमपेज › Nashik › नाशिक : शेतीच्या वादातून मारहाण ; महिलेचा मृत्यू

नाशिक : शेतीच्या वादातून मारहाण ; महिलेचा मृत्यू

Published On: Jan 27 2018 4:26PM | Last Updated: Jan 27 2018 4:27PMनाशिक  : सटाणा प्रतिनिधी
बागलाण तालुक्यातील कौतिकपाडे येथे शनिवारी (२७ जानेवारी) रोजी  शेतीच्या वादातून झालेल्या मारहाणीत एका महिलेचा मृत्यू झाला. तर चौघे गंभीर जखमी आहेत. एकाची प्रकृती चिंताजनक आहे. शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. 
शेतीच्या सामाईक बांधावरून दोन घरांमध्ये वाद सुरू होता. या वादातून एका कुटुंबांला जबर मारहाण करण्यात आली. यामध्ये एक महिला जागीच ठार झाली. रायकोरबाई नवल ठाणगे (वय ५०) असे मृत महिलेचे नाव आहे.

कुटुंबातील इतर सदस्य गंभीर जखमी तर एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला मालेगावला हलविण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिस निरीक्षक हिरालाल पाटील यांनी पाहणी केली. एका संशयितास पोलिसांनी अटक केली आहे.