Tue, Jul 23, 2019 02:29होमपेज › Nashik › शॉर्ट सर्किटमुळे झालेल्या स्फोटात एक जण जखमी 

शॉर्ट सर्किटमुळे झालेल्या स्फोटात एक जण जखमी 

Published On: Mar 25 2018 4:40PM | Last Updated: Mar 25 2018 4:40PMनाशिक : पुढारी ऑनलाईन

अंबड औद्योगिक परिसरात एका पाव-वडयाच्या दुकानात झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे गॅसच्या स्फोटात एक जण जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर शेजारील एटीएमचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. अद्यापही या घटनेची  पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आलेली नाही.

अंबड औद्योगिक परिसरातील सिमेंन्स कंपनी समोर काही प्रकल्प ग्रस्थांना जागा देण्यात आल्या आहेत. या जागेवर व्यवसाय करण्याकरिता गाळे बांधण्यात आले आहेत. छोट्या व्यवसांयाकरिता यातील काही गाळे भाड्याने देण्यात आले आहेत.

व्यवसायाकरिता भाड्याने दिलेल्या एका पाव-वडयाच्या दुकानात  सकाळी अचानक शॉर्ट सर्किटमुळे गॅसचा स्फोट झाला. जोराचा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी धाव घेतली. या अपघातात एक व्यक्ती जखमी झाली. जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव  प्रकाश जगताप असून ते स्वतः दुकान सांभळत असल्याची माहिती त्यांचा भाऊ विजय जगताप यांनी दिली. 

घटनास्थळी नगरसेवक राकेश दोंदे यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी परिसराची पाहणी करून गाळ्यांसमोरील अतिक्रमण हटवायला सांगितले. याआधी अतिक्रमण कारवाईची नोटिस सिडको विभागीय कार्यालयाला देण्यात आली होती. मात्र कोणत्याच प्रकारची भुमीका घेतली नसल्याने आज ही दुर्घटना घडली असल्याचे मत नगरसेवकांनी व्यक्‍त केले आहे. 

 

Tags : people, nashik,  injured, short circuit