Tue, Jan 22, 2019 23:14होमपेज › Nashik › नाशिक : रेल्वेतुन पडल्याने एक ठार 

नाशिक : रेल्वेतुन पडल्याने एक ठार 

Published On: Feb 14 2018 3:16PM | Last Updated: Feb 14 2018 3:16PMनाशिक : प्रतिनिधी 

धावत्या रेल्वेतून खाली पडल्याने 40 ते 45 वयोगटातील व्यक्तीचा मृत्यू झाला. मंगळवारी (दि.13) दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. व्यक्ती रेल्वेतून खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. 

भगूर शिवारातील डोंगरे मळा परिसरातील पोल क्रमांक 177/62 जवळ ही व्यक्ती रेल्वेतून खाली पडल्याने ठार झाली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.