Mon, Jul 22, 2019 13:11होमपेज › Nashik › एक कोटी सूर्यनमस्कार कार्यक्रम सुरू; पालकमंत्र्यांचाही सहभाग (व्हिडिओ)

एक कोटी सूर्यनमस्कार कार्यक्रम सुरू; पालकमंत्र्यांचाही सहभाग (व्हिडिओ)

Published On: Jan 24 2018 9:34AM | Last Updated: Jan 24 2018 9:34AMनाशिक : प्रतिनिधी

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळच्या वतीने संस्थेच्या शतकमहोत्सवी वर्षनिमित्त ९ शाळांचे ८ हजार विद्यार्थी मिनाताई ठाकरे स्टेडियमवर सूर्यनमस्कार घालून एक कोटी सूर्यनमस्काराची संकल्पपूर्ती करुन नवीन विक्रम प्रस्थापित करत आहेत. 

गतवर्षी रथसप्तमी ते आजची रथसप्तमी अशा १ वर्षात संस्थेच्या सर्व शाळांमध्ये आठवडयातून एकदा सूर्यनमस्कार घालणयाचे विद्यार्थ्यांनी निश्चित केले होते. या उपक्रमाअंतर्गत आज १ कोटी सूर्यनमस्कार पूर्ण होणार आहेत. या विक्रमाची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया सह वंडर बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. या उपक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री गिरीश महाजन, इंदोरचे योगगुरु ओमानंद गुरुजी उपस्थित आहेत. नाशिककरांसह परदेशी पाहुणे देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.