होमपेज › Nashik › मनमाडला गावठी कट्ट्यासह एक जण पोलिसांच्या ताब्यात

मनमाडला गावठी कट्ट्यासह एक जण पोलिसांच्या ताब्यात

Published On: Sep 10 2018 1:17AM | Last Updated: Sep 09 2018 10:36PMमनमाड : वार्ताहर

येथील चौफुलीवर सापळा रचून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने एका जणाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतूस जप्‍त केली. गुलाम फरीद अब्दुल वाहिद (रा. मोहनबाबा नगर, मालेगाव) असे पकडण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

गेल्या महिन्यात शहरातील भगतसिंग मैदानातून दोन आरोपींना पकडून त्यांच्याकडून गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्‍त करण्याची कारवाई करण्यात आलेली होती. याबाबत अधिक माहिती अशी की, गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक अशोक करपे, उपनिरीक्षक स्वप्नील नाईक, सहाय्यक निरीक्षक अशोक पाटील, पो.ह. चेतन संवत्सरकर, हरीश आव्हाड, गिरीश बागूल गस्तीवर असताना त्यांना मनमाडच्या चौफुलीवर भरधाव वेगाने जाणारी मोटारसायकल दिसली. त्यांनी तिचा पाठलाग करून दुचाकीस्वाराला पकडले. त्याची झडती घेतली असताना त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल दोन जिवंत काडतूस आढळून आले. संशयिताविरोधात मनमाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.