Mon, Mar 25, 2019 13:14होमपेज › Nashik › कारागृहात कर्मचार्‍यांचे आक्षेपार्ह वर्तन

कारागृहात कर्मचार्‍यांचे आक्षेपार्ह वर्तन

Published On: Jan 01 2018 2:01AM | Last Updated: Dec 31 2017 11:04PM

बुकमार्क करा
उपनगर : वार्ताहर

सेवा बजावत असताना रात्रीच्या वेळी कारागृहाबाहेर ये-जा करणार्‍या दोन कर्मचार्‍यांचे अधीक्षकांनी निलंबन केले आहे. अधीक्षकांनी बजावलेली नोटीस कारागृहातील कर्मचार्‍यांनी घेण्यास नकार दिला असून, वरील कर्मचार्‍यांनी अधीक्षकांविरोधात बंड पुकारत अपर पोलीस महासंचालक भूषणकुमार उपाध्याय यांच्याकडे दाद मागितली आहे.

रात्रीच्या वेळी कारागृहात सेवा बजावत असताना आवक-जावक वहीत नोंद करून कारागृहाबाहेर गेल्याप्रकरणी कारागृहातील कर्मचारी अनिल पवार (शिपाई) आणि बाळू पालवे (हवालदार) यांना निलंबित करण्याचे लेखी आदेश दिले आहेत. मात्र, या कर्मचार्‍यांना हे आरोप मान्य नसून, त्यांनी आपली बाजू अपर पोलीस महासंचालकांकडे मांडली आहे. यावर वरिष्ठ निर्णय घेणार असून, कारागृहाच्या कारभाराबाबत  पुन्हा एकदा प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. या कर्मचार्‍यांना पुन्हा रुजू करून घेण्याचे आदेश वरिष्ठ कार्यालयाकडून अधीक्षकांना देण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, याला अधिकृतरीत्या दुजोरा मिळू शकला नाही.