होमपेज › Nashik › नाशिकरोड रेल्वे स्थानकावर सरकत्या जिन्याचे लोकार्पण 

नाशिकरोड रेल्वे स्थानकावर सरकत्या जिन्याचे लोकार्पण 

Published On: Jul 21 2018 3:28PM | Last Updated: Jul 21 2018 3:28PMनाशिक : प्रतिनिधी

येथील नाशिकरोड रेल्वे स्थानकावर शनिवारी ( दि.२१ ) सकाळी खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते सरकत्या जिन्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. यामुळे मागील अनेक दिवसांपासून प्रवाशांना सरकत्या जिन्याची प्रतीक्षा होती. याप्रसंगी वरीष्ठ रेल्वे अधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी रेल्वे स्थानकाचे प्रबंदक आर. के. कुठार , रेल्वे सुरक्षा दलाचे अधिक्षक जुबेर पठाण,   सहायक पोलिस निरीक्षक संजय गांगुर्डे, प्रवीण पाटील, मधुकर गोसावी, अजयकुमार सनोरीय, पी. एच. वाघ,  राजेश फोकणे, नितीन चिडे, मधुकर मालूजकर आदी उपस्थित होते.   

यावेळी खासदार हेमंत गोडसे म्हणाले, येथील फलाट क्रमांक एक, दोन आणि तीन वर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जिना उपयोगात येणार आहे. नाशिकरोड रेल्वे स्थानकावर सरकता जिना व्हावा अशी रेल्वे प्रवाशांची मागणी होती.  शनिवारी झालेल्या लोकार्पण सोहळ्यानंतर प्रवाशांची मागणी खऱ्या अर्थाने पूर्ण झाली असल्याचे त्यांनी म्हटले.

 रेल्वे सेवेमुळे नाशिक भारताच्या नकाशावर आले आहे . नाशिक येथे बारा वर्षाने भरणारा कुंभमेळा आणि नाशिक शहराला कथा, पुराणात असलेले महत्व लक्ष्यात घेता येथे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे कायम वर्दळीचे स्थानक असलेल्या नाशिकरोड रेल्वे स्थानकावरील प्रवाशी मागील अनेक वर्षांपासून सरकत्या जिन्याच्या सुविधे पासून वंचित होते. मागणी पूर्ण झाल्याने प्रवाश्यांनी समाधान व्यक्त केले आहे.