Wed, Sep 26, 2018 18:07



होमपेज › Nashik › मुख्याद्यापिकेवर पतीनेच केला चाकू हल्ला 

मुख्याद्यापिकेवर पतीनेच केला चाकू हल्ला 

Published On: Feb 27 2018 5:27PM | Last Updated: Feb 27 2018 5:27PM



नाशिकरोड : प्रतिनिधी 

नाशिकच्या उपनगर परिसरातील महाराष्ट्र हायस्कुलच्या मुख्याद्याकपिकेवर तिच्या पतीनेच चाकूने हल्ला केल्याची घटना मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान घडली. यामुळे शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे .

तारा मधुकर मोरे (वय 54) राहणार नेहरूनगर असे हल्ला झालेल्या मुख्याद्याकपिकेचे नाव आहे. मुख्याद्याकपिका शाळेच्या आवारात असताना पती मधुकर मोरे याने त्यांच्या हात,पाय आणि चेहऱ्यावर धारदार चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात मुख्यद्यापिका तारा मोरे यांच्या अंगावर जखमा झाल्या असून, त्‍यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. महापालिकेच्या बिटको रूग्णालयात मोरे यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली. दरम्यान मुख्यद्यापिकेवर हल्ला करणाऱ्या पतीचा उपनगर पोलीस ठाण्याचे पोलिस शोध घेत आहे.