Wed, Dec 19, 2018 22:01होमपेज › Nashik › मुख्याद्यापीकेकडून विद्यार्थ्यांना बेदम मारहाण 

मुख्याद्यापीकेकडून विद्यार्थ्यांना बेदम मारहाण 

Published On: Feb 06 2018 8:20PM | Last Updated: Feb 06 2018 8:20PM नाशिकरोड : वार्ताहर

नाशिकरोड येथील जुना सायखेडा रोडवरील एक खाजगी शाळेतील मुख्याद्यापीकेने पाचवी आणि सातवी मधील विदयार्थ्यांना लाकडी छडीने बेदम मारहाण केली. संतप्त पालकांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे  .

जेलरोड परिसरातील बिटको शाळेत काही विद्यार्थ्यांना ज्युस मधून विषबाधा झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी उजेडात आली होती. हे प्रकरण शांत होत नाही तोच जुना सायखेडा रोडवरील येमराल्ड शाळेत विद्यार्थ्यांनी गृहपाठ केला नाही म्हणून मुख्याद्यापीका जयश्री रोडे यांनी विद्यार्थ्यांना लाकडी छडीने बेदम मारहाण केली. हाता पायावर छडीचे वळ उमटल्याने पालकांनी याबाबत शाळा प्रशासनाकडे धाव घेत जाब विचारला. मात्र मुख्याद्यापीका रोडे यांनी पालकांचे समाधान करणे तर दूरच उलट पालकांनाच विद्यार्थी गृहपाठ वेळेत करीत नाही अशी तक्रार देत जाब विचारला. मुख्यद्यापीका रोडे यांच्या उडवाउडवीची उलट उत्तरे ऐकून पालकांनी नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांची भेट घेत तक्रार दाखल केली. नाशिकरोड पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखुन मुख्याद्यापीका रोडे यांना ताब्यात घेतले आहे.

ओम भारत भोईटे (वय१०) व ग्रंथाली मंगेश बोंडे (वय ९) अशी मारहाण झालेल्या विदयार्थीची नावे आहेत. जखमी  विद्यार्थ्यांच्या पालकांनी जागरूकता दाखविल्याने मारहाणीची घटना उजेडात आली. दरम्यान जेलरोड परिसरातील खाजगी शाळेमधील विदयार्थ्यांना मारहाण करण्याच्या घटना नारायण बापू नगर परिसरातील स्कॉटिश शाळेत देखील घडलेली आहे .मुख्यद्यापीका रमा रेड्डी यांच्या विरोधात उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मंगळवारच्या घटनेमुळे स्कॉटिश शाळेतील विद्यार्थी मारहाण प्रकरणाला उजाळा मिळाला आहे .

मारहाण करणे गुन्हाच 

सन २०१२ मधील आकारिक मूल्यमापन शिक्षण प्रणाली। देशभरात लागू झाली असून, विद्यार्थ्यांना सक्तीचे शिक्षण , आठववी पर्यंत विद्यार्थ्यांना नापास न करणे , तसेच विद्यार्थ्यांना मारहाण करणे कायदेशीर गुन्हा ठरविण्याची तरतूद केंद्राच्या नव्या कायद्यात आहे. मात्र असे असतानाही विद्यार्थ्यांना सर्रासपणे शिक्षकाकडून मारहाण करण्याच्या घटना घडतच आहेत.

चौकशी करून कारवाई : रामचंद्र जाधव , शिक्षण उपसंचालक

शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षक अथवा कर्मचाऱ्यांकडून मारहाण होणे कायदेशीर गुन्हा ठरतो, पालकांनी तक्रार दिली तर निश्चित पणे दखल घेतली जाईलण. चौकशी करून मारहाणीचा तपास करू असे जाधव यांनी म्हटले आहे.