Thu, Mar 21, 2019 23:37
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › नाशिकः रिक्षाचालकाचा भोकसून खून

नाशिकः रिक्षाचालकाचा भोकसून खून

Published On: Dec 27 2017 10:36PM | Last Updated: Dec 27 2017 10:36PM

बुकमार्क करा
नाशिकः प्रतिनिधी

महालक्ष्मीनगर अंबड येथे आज रात्रीच्या सुमारास एका रिक्षा चलाकाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. खून करून मारेकर्‍यांनी घटना स्थळावरून पळ काढला. याबाबत अंबड पोलिसांना माहिती मिळताच मरेकर्‍यांच्या शोधासाठी पोलिस पथक रवाना झाले आहे.

अंबड महालक्ष्मी नगर येथे राहणारा रिक्षा चालक साहेबराव जाधव याचे काही अज्ञात लोकांबरोबर झालेल्या वादातून ही घटना घडली. मारेकर्‍यांनी लाकडी दांडक्यांनी मारहाण केली. यात जाधव गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी मयत घोषित केले.

जाधव यांना सोशल मिडीयावर जीवे ठार मारण्याच्या धमक्या देण्यात येत असल्याची माहिती समजते. घटना स्थळी अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक मधुकर कड यांच्या समवेत परिमंडळ दोनचे पोलिस उपआयुक्त श्रीकृष्ण कोकाटे घटना स्थळी उपस्थित होते.