Sat, Mar 23, 2019 12:03होमपेज › Nashik › नार-पारसाठी वारकरी पंतप्रधानांच्या दारी!

 नार-पारसाठी वारकरी पंतप्रधानांच्या दारी!

Published On: Mar 21 2018 1:40AM | Last Updated: Mar 21 2018 1:40AMलासलगाव/पिंपळगाव वाखारी 
नाशिक जिल्ह्यातील पाणीप्रश्‍न बिकट बनला असून, नार-पार प्रकल्प पूर्ण करण्याचे साकडे खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली वारकर्‍यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घालण्यात आले. 

या भेटीत खासदार चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रातील उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाणीप्रश्‍नाबाबत माहिती दिली.शेती सिंचनासाठी व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर होत चालला आहे. महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यातील शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती खूप दयनीय झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दमनगंगा-पिंजालसंदर्भात चार आंतरराज्यीय संपर्क परियोजना आणि समग्र योजनांमध्ये पार-तापी-नर्मदा संपर्क परियोजना समाविष्ट करण्याचे ठरविले होते. नार-पार-गिरणा, पार-तापी-गोदावरी, दमनगंगा-पिंजाल/इकडारे/-गोदावरी घाट संपर्क आणि दमनगंगा-वैतरणा-गोदावरी/कडवादेव या दोन परियोजना आणि महाराष्ट्र सरकारद्वारे सुचविण्यात आलेल्या परियोजनांसाठी लागणारा खर्च व भागीदारीसाठीच्या ठरावाचा मसुदा सहमतीसाठी महाराष्ट्र व गुजरात सरकारला पाठविण्यात आलेला आहे. त्यामुळे हा मसुदा लवकर संमत होण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी यावेळी पंतप्रधान मोदी यांच्याकडे करण्यात आली. यावेळी महेश शिरोरे, सुभाष बिरारी, पोपट कोठावदे, हिरामण बच्छाव, यादव शेवाळे, बाळू बोरसे, साहेबराव मोरे, राजेंद्र बोरसे, मोठाभाऊ नंदाले, निरंजन बहिरम उपस्थित होते.