Thu, May 23, 2019 21:06
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › ५५ हजार शेतकर्‍यांना कर्जमाफीची प्रतीक्षा

५५ हजार शेतकर्‍यांना कर्जमाफीची प्रतीक्षा

Published On: Dec 13 2017 1:58AM | Last Updated: Dec 12 2017 11:48PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

दीड लाख रुपयावर कर्ज थकीत असलेल्या 55 हजार शेतकर्‍यांना अद्याप कर्जमाफीची प्रतीक्षा आहे. या शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यासाठी आवश्यक असलेली रक्कम सरकारी पातळीवरून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला प्राप्त झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दीड लाखापर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकर्‍यांना कर्जमाफीच्या निर्णयाचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. या शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यासाठी जिल्हा बँकेला आधी पावणेचार कोटी, त्यानंतर 50 कोटी आणि 247 कोटी रुपये प्राप्त झाले असून, ही सारीच रक्कम संबंधित शेतकर्‍यांच्या कर्जखात्यावर जमा करण्यात आली आहे. दुसरीकडे दीड लाख रुपयावर कर्ज असलेल्या शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी मात्र आधी वरील रक्कम भरावी लागणार आहे. म्हणजे, एखाद्या शेतकर्‍याचे दोन लाख रुपये कर्ज थकीत असल्यास त्यास आधी वरील 50 हजार रुपये भरावे लागणार आहेत. त्यानंतरच मात्र दीड लाख रुपयाची रक्कम त्यांच्या कर्जखात्यावर जमा होणार आहे. जिल्हा बँकेत दोन लाख रुपयांवर कर्ज थकीत असलेल्या शेतकर्‍यांची संख्या 55 हजार आहे. एकीकडे दीड लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ होत असल्याने संबंधित शेतकर्‍यांमध्ये उत्साहाचे वातावरण असताना दुसरीकडे दीड लाख रुपयावरील थकबाकीदार शेतकर्‍यांना मात्र आधी वरील रकमेची तजवीज करावी लागणार आहे. त्याशिवाय सरकारही या शेतकर्‍यांची दीड लाख रुपयापर्यंतची रक्कम जिल्हा बँकेला देणार नाही.