Sun, Aug 25, 2019 00:18होमपेज › Nashik › इमारतीवरून पडणार्‍या मुलीला वाचवताना वडिलांचा मृत्‍यू

इमारतीवरून पडणार्‍या मुलीला वाचवताना वडिलांचा मृत्‍यू

Published On: Apr 27 2018 8:05PM | Last Updated: Apr 27 2018 8:05PMउपनगर : वार्ताहर 

पाय घसरून पाचव्या मजल्‍यावरून पडणार्‍या मुलीला वाचवताना पित्‍याचा दुर्दैवी मृत्‍यू झाला. इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून तोल गेल्‍याने मुलगी खाली पडत असताना तीला वाचविण्यासाठी पुढे गेलेल्‍या वडिलांच्याच अंगावर ती पडल्‍याने मुलगी आणि वडील दोघेही गंभीर जखमी झाले. या घटनेमध्ये वडील मृत पावले असून मुलगी हि गंभीर जखमी झालेली आहे. या घटनेमुळे सामनगाव रोड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सामनगाव रोड येथे अश्विन कॉलनी मध्ये म्हाडाची घरे आहेत. या घरांमध्ये लोकवस्ती मोठ्या प्रमाणात आहे. गुरूवार दि २६ एप्रिल रोजी रात्री १० वाजता गोधडे कुटुंबियांच्या घरी हळदीचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी सुनंदा गोधडे  (वय १४ ) या  मुलीचा पाचव्या मजल्यावरून अचानक तोल गेला. आणि ती खाली पडत असताना पाहून उपस्‍थित महिलांनी  आरडओरड केली. आपली मुलगी खाली पडत असत्‍याचे पाहून वडील  विजय गोधडे हे तिला वाचविण्यासाठी धावले असता, मुलगी त्यांच्या अंगावर वेगाने खाली पडली. यामध्ये मुलगी आणि वडील दोघेही जखमी झाले. या दोघांनाही रूग्णालयात दाखल केले असता, वडिलांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. मुलीच्या हाताला गंभीर दुखापत झालेली असून, तिच्यावर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत विजय गोधडे यांच्यावर आज शुक्रवार दि २७ एप्रिल रोजी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी दोन मुली दोन मुले असा परिवार आहे. नाशिक रोड पोलीस स्टेशन ला या घटनेची आकस्मित मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे.