Thu, Jul 18, 2019 05:03होमपेज › Nashik › सीसीटीव्ही फुटेजवरून दानपेटी चोर गजाआड 

सीसीटीव्ही फुटेजवरून दानपेटी चोर गजाआड 

Published On: Aug 25 2018 6:36PM | Last Updated: Aug 25 2018 6:36PMउपनगर : वार्ताहर

उपनगर पलिस स्टेशन हद्दीमधील डी जी पी नगर येथील साईबाबा मंदिरात दान पेटीची चोरी झाली होती. मात्र मंदिरातील सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी पेटी चोरणार्‍या चोरट्याला अटक केली आहे.

नाशिक पुणे रोड वरील डी जी पी नगर वासाहतीत साईबाबा मंदिर आहे. या मंदिरातील दान पेटी चोरट्‍यांनी रात्रीच्या वेळी चोरून नेली होती. या बाबत उपनगर पोलिसांकडे रहिवाशांनी तक्रार केली होती. पोलिसांनी शोध सुरु केला असता, मंदिरात व परिसरातील सीसी टी व्ही च्या मदतीने केमेर्‍यात संशयित बंदिस्त झाले होते. या वेळी उपनगर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे संशयित आरोपी सुरज दिलीप बागुल (वय २४ , राहणार- उपनगर मोरे मळा ) याला अटक केली असून, त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. दरम्यान सुरज मोरे कडून अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून उपनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते,पी एस आय गणेश जाधव,सुनील कोकाटे, प्रजीत ठाकुर हे तपास करीत आहे.

दरम्यान उपनगर पोलिसांनी नाशिक रोड आणि आसपासच्या परिसरात सी सी टी व्ही कामेरे बसवण्याचे रहिवाशांना आवाहन केले आहे. सामाजिक संस्था व लोकप्रतीनिधींनाही सीसीटीव्ही बसवण्यासाठी उपनगर पलिस आवाहन करीत आहेत.