Sat, Dec 07, 2019 14:01होमपेज › Nashik › 'भीमा-कोरेगाव येथे दंगल घडवणाऱ्यांवर कारवाई करावी'

'भीमा-कोरेगाव येथे दंगल घडवणाऱ्यांवर कारवाई करावी'

Published On: Jan 03 2018 5:12PM | Last Updated: Jan 03 2018 5:12PM

बुकमार्क करा

उपनगर : वार्ताहर  

दंगल घडवणाऱ्या समाज कंटकांवर कार्यवाही करावी अशी मागणी मराठा आणि नाभिक समाजाकडून करण्यात आली आहे. यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयाला निवेदन देण्यात आले.

१ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी जमलेल्या अनुयायांवर, त्यांच्या वाहनांवर दगडफेक करत जाळपोळ व तोडफोड करणाऱ्या समाजकंटक,दंगलखोरांवर तातडीने कारवाई करण्यात यावी. ही जातीय दंगल पेटवणारे धर्मांध मिलिंद एकबोटे व मनोहर भिडे यांच्यावर गुन्हा दाखल होऊनही त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही, त्यांच्यावरही तातडीने कारवाई करण्यात यावी. मिलिंद एकबोटेच्या हिंदू एकता आघाडी व मनोहर भिडेच्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या धर्मांध व जातीयवादी संघटनांवर कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी. अशी मागणी मराठा समाज व नाभिक समाजाच्या वतीने नाशिक रोड येथे विभागीय उपायुक्त यांच्याकडे करण्यात आली व सदर मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी संतोष गायधनी, प्रसाद देशमुख, राहुल औटे, पुरुषोत्तम गोरडे, राहुल तुपे, यश बच्छाव,अक्षय शिरसाठ,अमित घोडे,अतुल चव्हाण,भरत गायकवाड,शिरीष टिळे, राजेंद्र पाळदे,सागर कुशारे,गणेश ढेमसे, प्रतीक पवार,अनिकेत पवार,आकाश शेटे,शेखर घोरपडे,मयूर वाघ,स्वप्नील सोनवणे आदी.उपस्थित होते.