Mon, Jan 21, 2019 19:14होमपेज › Nashik › न्यायालयातील दोन लिपिक निलंबित 

न्यायालयातील दोन लिपिक निलंबित 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

वॉरंटवर कनिष्ठ लिपिकांनीच परस्पर न्यायाधीशांच्या स्वाक्षर्‍या केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी दोन कनिष्ठ लिपिकांना प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी निलंबित केले आहे. बी. बी. आंधळे आणि आर. बी. बलसाणे अशी या दोघा लिपिकांची नावे आहेत.  जिल्हा न्यायालयातील डी. व्ही. देढिया यांच्या न्यायालयातील कनिष्ठ लिपिक आंधळे यांनी  आदेश व वॉरंटवर परस्पर न्यायाधीशांच्या स्वाक्षर्‍या केल्याचे समोर आले. याप्रमाणेच दिंडोरीतील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जी. एस. बोरा यांच्या न्यायालयातील कनिष्ठ लिपिक बलसाणे यांनीही  वॉरंटवर परस्पर न्यायाधीशांच्या स्वाक्षर्‍या केल्याचे उघडकीस आले.