Tue, Apr 23, 2019 23:32होमपेज › Nashik › ‘ओखी’ नुकसानीची आजपासून पाहणी

‘ओखी’ नुकसानीची आजपासून पाहणी

Published On: Dec 08 2017 1:40AM | Last Updated: Dec 07 2017 11:46PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

ओखी वादळामुळे जिल्ह्यातील हानी झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. महसूल व कृषी विभागाचे अधिकारी शुक्रवारपासून (दि. 8) बांधावर जाऊन पंचनामे करणार आहेत. दरम्यान, ऑक्टोबरमध्ये अवकाळीने नुकसान झालेल्या भागात फेरपंचनामे न करण्याच्या स्पष्ट सूचनाही सरकारने दिल्या आहेत.  

पाऊस तसेच वातावरण बदलाचा फटका जिल्ह्यातील द्राक्ष, कांदा, मका, डाळिंब, गहू यासह इतर भाजीपाला पिकांना बसला. द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झाले. त्यामुळेच ओखीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्याची मागणी जोर धरत होती. पंचनाम्याची मागणी विचारात घेता राज्य सरकारने नुकसानीची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश काढले आहेत.या पावसाने 337 गावांमधील नऊ हजार 686 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. एकूण 19 हजार 197 शेतकरी यामुळे बाधित झाले आहे.